झोपडपट्टीत वैद्यकीय उपचारांसाठी शिबीराचे आयोजन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतल्या झोपडपट्टी परिसरात मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी अॅक्सिस मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाने पुढाकार घेतला आहे. या निमित्ताने अॅक्सिस मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या वतीने गुरुवारी एक शिबीर घेण्यात आले. ज्यात जवळपास 100 रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार आणि सल्ला देण्यात आला. गोरेगावच्या भगत सिंहनगर येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

रुग्णालयाच्या वतीने 2016 मध्ये 35 ते 40 वैद्यकीय शिबिराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या वर्षी आतापर्यंत 14 वैद्यकीय शिबीर राबवण्यात आली आहेत. या वर्षीच्या प्रत्येक महिन्यात जवळपास 7 ते 8 मोफत वैद्यकीय शिबीर राबवण्यात येणार असल्याची माहिती अॅक्सिस मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचे संचालक डॉ. उमेश शेट्टी यांनी दिली. यावेळी रुग्णांना औषधे, कॅल्शियमच्या गोळ्या मोफत देण्यात आल्या. रँडम ब्लड शुगर, रक्तदाब आणि ऑर्थोपेडिक यांच्या तपासण्याही मोफत करण्यात आल्या. याशिवाय रुग्णांना डॉक्टरांचा सल्लाही देण्यात आला.

पुढील बातमी
इतर बातम्या