पोलिसात भरती व्हायचंय? मग झोपा रस्त्यावर

  • सय्यद झैन & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

विक्रोळी- महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांवर चक्क रस्त्यांवर झोपण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी 1 हजार 717 जागांसाठी मुंबईमध्ये 29 मार्चपासून भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातून रोज सुमारे 6 हजार उमेदवार येतात. मात्र प्रशासनाकडून त्यांच्यासाठी कोणतीच व्यवस्था न केल्यानं त्यांना रस्त्यावर रात्र काढावी लागत आहे. विशेष म्हणजे मूलभूत सुविधा या उमेेदवारांना देणं गरजेचं होतं. मात्र त्याही पुरवल्या जात नसल्याचे ढळढळीत वास्तव समोर आले आहे. 

रोज मोठ्या प्रमाणात उमेदवार भरती प्रक्रियेसाठी येत असताना देखील फक्त एका मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या वातावरणात झालेला बदल, त्यातच रात्री रस्त्यावर झोपावं लागत असल्याने भरती प्रक्रियेसाठी आलेल्या या उमेदवारांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या