गणपती विसर्जनासाठी फिरते तलाव सोसायट्यांच्या दारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेने यंदाच्या गणेशोत्सवासाठी 'फिरते कृत्रिम तलाव' ही अभिनव संकल्पना आणली आहे. यामुळे भाविकांना सोसायटीच्या दारातच गणपती मूर्तींचे विसर्जन करता येणार आहे, ज्यामुळे गर्दी आणि प्रदूषण टाळता येईल.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला चालना देण्यासाठी आणि विसर्जनाच्या वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा पुढाकार घेतला आहे.

मुंबईत सुमारे 12 हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आणि 2.25 लाख घरगुती गणपती बसवले जातात. यातील अनेक मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नैसर्गिक जलस्रोतांवर विसर्जन केल्या जातात. यामुळे भाविकांची गैरसोय होते आणि पालिकेच्या नियोजनावर ताण येतो.

हा त्रास कमी करण्यासाठीच पालिकेने ही नवीन संकल्पना आणली आहे. यामुळे भाविकांना आपल्या बाप्पाची शेवटची पूजा आणि आरती करून मूर्ती पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे सोपवता येईल. पालिकेचे कर्मचारी या मूर्तींचे शास्त्रीय पद्धतीने विसर्जन करतील.

कृत्रिम तलाव आणि परवानगी

यंदाच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी पालिकेने मुंबई शहरात एकूण 288 कृत्रिम तलाव निर्माण केले आहेत. भाविकांना 'माय बीएमसी' ॲपवर या तलावांमध्ये विसर्जनासाठी नोंदणी करता येईल. यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पालिकेकडे 2,625 अर्ज आले असून, परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू आहे.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

गणेशोत्सवादरम्यान मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. 24 तास कडक सुरक्षा व्यवस्था राखली जाणार असून, शहरात 11,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तसेच, 15,000 पोलिसांची फौज संपूर्ण शहरात तैनात करण्यात येणार आहे.


हेही वाचा

आता लालबागच्या राजाचा प्रसाद ऑनलाइन मिळणार

6 फूटाची गणेशमूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करा: आयुक्त सौरभ राव

पुढील बातमी
इतर बातम्या