पालघर (palghar) जिल्ह्यातील गारगाई नदीवर (gargai river) धरण बांधण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा काढली आहे. हा प्रकल्प गेल्या दशकभरापासून चर्चेत आहे.
मुंबईचा (mumbai) आठवा जलस्रोत म्हणून या धरणातून शहराला तब्बल 450 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणीपुरवठा (water supply) केला जाणार आहे.
त्यासाठी अंदाजे 3,040 कोटी रुपये खर्च येईल. 2014 मध्ये पूर्ण झालेल्या मध्य वैतरणा (middle vaitarna)धरण प्रकल्पानंतर हा उपक्रम राबवण्यात आला आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकल्पात 69 मीटर उंच धरण आणि 2.2 मीटर व्यासाचा 1.6 किमीचा पाणीपुरवठा बोगदा बांधण्यात येणार आहे.
गारगाई जलाशयाचे पाणी या बोगद्याद्वारे मोडक सागर जलाशयामध्ये सोडले जाईल जिथून ते मुंबईला पाणी पुरवणार आहे.
जलाशयाजवळ एक कायमस्वरूपी अतिथीगृह, एक सभागृह आणि एक कार्यालय-सह-प्रशासकीय संकुल विकसित करण्याची देखील महापालिकेची योजना आहे.
तानसा वन्यजीव अभयारण्यातील प्रस्तावित धरणामुळे 658 हेक्टर वनजमीन हटवली जाणार आहे.
तसेच ओगडा आणि खोडाडा ही दोन गावे पूर्णपणे पाण्याखाली जाणार आहेत. तर पाचघर, तिलमाळ, फणसगाव आणि आमले अंशतः बाधित होतील.
प्रकल्पग्रस्त व्यक्तींना पालघर जिल्ह्यातील देवळी येथे वन विकास महामंडळाच्या 400 हेक्टर जमिनीवर स्थलांतरित केले जाईल.
हेही वाचा