वरळीच्या बीडीडी चाळीत गॅसचा स्फोट; ४ जण जखमी

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वरळी परिसरातील बीडीडी चाळीमधील एका इमारतीत गॅसचा स्फोट झाला. मंगळवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास गॅसचा स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेत ४ जण जखमी झाल्याचं समजतं.

या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दल आणि पोलीस तसंच, वॉर्डातील अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाकडून सकाळी ९.४४ वाजेपर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही आग आता आटोक्यात आणण्यात आली आहे.

आनंदी पुरी (२७), मंगेश पुरी (४ महिने), विद्या पुरी (५), विष्णु पुरी (५ महिने) अशी या जखमींची नावं आहेत. या ४ जणांना नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. यातील ४ महिन्यांचे बाळ आणि आनंद पुरी यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. तर विद्या पुरी आणि विष्णू पुरी या दोघांची प्रकृती स्थिर आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या