अनधिकृत तबेलाधारकांमुळे गोरेगावातले रहिवासी त्रस्त

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

तबेल्याच्या अस्वच्छतेमुळे गोरेगाव (प.) येथील जवाहरनगरमधील रहिवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत स्थानिक नागरिकांनी पालिकेच्या पी दक्षिण विभाग, गोरेगाव पोलीस ठाणे आणि मालाडा कोंडवाडा विभागाकडे वारंवार तक्रार करूनही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

जवाहनगर रोड 17 येथील विद्यावर्धिनी संस्था पथ येथे एका अनधिकृत तबेला धारकाने जवळपास 30 गायी रस्त्यावर सोडल्याने परिसरात अस्वच्छता पसरली आहे. त्यामुळे त्या परिसरता डास, माशा आणि दुर्गंधीचा उपद्रव पसरला आहे. या अस्वच्छतेमुळे या रस्त्यावरून ये-जा करणेही कठीण होत आहे. या अस्वच्छतेचा नाहक त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. गायी जेथे उभ्या असतात, तेथेच एक कचरा कुंडी आहे. त्या कचराकुंडीत गायी भुकेपोटी अन्नाच्या शोधात कचराही खातात अशी तक्रार इथल्या स्थानिकांनी केली आहे.

गेल्या 5 वर्षांपासून या अनधिकृत तबेलाधारकामुळे घाणीचा प्रचंड त्रास होत आहे. वारंवार पालिका विभागाचे जिने झिजवले. मात्र पालिका अधिकारी तात्पुरती कारवाई करतात. त्यामुळे तबेलाधारक पुन्हा तेथे आपलं बस्तान मांडतो. पालिका विभागाने या तबेलाधारकावर कायमस्वरूपी कारवाई करून त्याचे या परिसरातून स्थलांतर करावे.
- भरत पंड्या, स्थानिक नागरिक आणि तक्रारदार


अनधिकृत तबेलाधारक आणि गायींवर कारवाई सुरू केली आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून शुक्रवारी 28 एप्रिलला संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- चंदा राव, सहाय्यक आयुक्त, पी दक्षिण पालिका विभाग

पुढील बातमी
इतर बातम्या