झाडे चालली राणीच्या बागेत

  • श्रद्धा चव्हाण & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

गोरेगाव - शाळेतल्या मुलांना विविध फळ-भाज्यांची माहिती मिळावी यासाठी महापालिका पी दक्षिण कार्यलयाच्या चौथ्या मजल्याच्या गच्चीवर सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे.

शाळेतील मुलांना वेगवेगळ्या झाडांची, फुलांची, भाज्यांची माहीती देण्यासाठी भायखळ्यातील राणीच्या बागेत दरवर्षी जानेवारी महिन्यात प्रदर्शन भरवलं जातं. त्या प्रदर्शनात 24 वॉर्डमधून निरनिराळी झाडं येथे आणली जातात. त्यासाठी प्रत्येक वॉर्डमध्ये तीन महिन्यापूर्वीच बिया आणून रुजवल्या जातात. मग त्यांचं झाड बनलं की प्रदर्शनाला घेऊन जातात. या वर्षी पी दक्षिण कार्यलयातील गच्चीवर वांगी, कोबी, दोडके, भेंडी, सूर्यफुल, झेंडू, चिकू, मुळा, मिरची, कणीस यांची झाडं लावली असून माळी त्यांची देखभाल करत आहेत.

पुढील बातमी
इतर बातम्या