'लक्ष्यवेध'ची मार्गदर्शन कार्यशाळा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नव उद्योजकांनी व्यवसाय कसा आणि कधी करावा यासाठी मोफत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन माटुंग्यातील मैसूर असोसिएशन सभागृहात 6 जून रोजी करण्यात आले होते. यशस्वी आणि स्वतंत्र उद्योजक बनण्यासाठी उपयोगी असे उत्तम मार्गदर्शन येथे करण्यात आले. ही कार्यशाळा 'लक्ष्यवेध इन्स्टिट्युट ऑफ लीडरशिप अॅण्ड एक्सलन्स' या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आली होती.

लक्ष्यवेध संस्थेचे संस्थापक आणि प्रशिक्षक अतुल राजोळी यांनी उपस्थितांना व्यावसायिक दृष्टिकोन लक्ष्यवेधच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण क्रमाची विस्तृत माहिती या वेळी पटवून दिली. या कार्यशाळेच्या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक डॉ. अविनाश फडके यांनी डॉक्टरी ते व्यावसायिक क्षेत्रापर्यंतचा आपला प्रवास श्रोत्यांपुढे मांडला. फक्त व्यावसायिक दृष्ट्या काम करून उद्योजक होता येत नाही तर, त्यासाठी अचूक क्षेत्राची निवड आणि आत्मविश्वासही गरजेचे असते असे फडके यावेळीस म्हणाले.

लक्ष्यवेध संस्था ही गेल्या 9 वर्षांपासून कार्यरत आहे. ही संस्था फक्त एका उद्योजकालाच न घडवता त्यातील सुसज्ज आणि सक्षम नागरिकालाही प्रोत्साहन देते, असे फडके यांनी सांगितले. यंदाचा हा लक्ष्यवेध संस्थेचा 31 वा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. यापुढेही आगामी कार्यक्रम 15 जून ते 1 ऑगस्टपर्यंत लक्ष्यवेध संस्थेमार्फत घेतले जातील.

पुढील बातमी
इतर बातम्या