महाराष्ट्रातील महानंद डेअरीवर गुजरातच्या मदर डेअरीचा ताबा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ, मर्यादित, मुंबई अर्थात महानंद (Mahananda Dairy) आता इतिहास जमा झालेला आहे.

महानंदचा ताबा आता गुजरातमधील मदर डेअरीकडे (Mother Dairy) देण्यात आला आहे. महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया 2 मे रोजी पूर्ण झाली आहे.

मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी 253 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य करणार आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ म्हणजे महानंद डेअरी इतिहास जमा झाली आहे. 

मदर डेअरी ही राष्ट्रीय दुग्धविकास विकास मंडळाकडून चालवली जाते.

महानंद संस्था एनडीडीबीब म्हणजेच राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाकडे हस्तांतरित करण्यामध्ये प्रमुख अडसर हा महानंदचे संचालक मंडळ हा होता.

गुजरातमधील आनंद जिल्ह्यातील राष्ट्रीय दुग्धविकास मंडळानं महानंदला संचालक मंडळ नको असल्याबाबतची अट घातली होती. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात महानंदचे चेअरमन राजेश परजणे यांच्यासह संचालक मंडळानं राजीनामा दिला होता.


हेही वाचा

अन्नातून विषबाधेच्या घटनेनंतर पालिका म्हणते...

पुढील बातमी
इतर बातम्या