मुंबईत उष्मा आणखी वाढू शकतो

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई आणि परिसरात अधूनमधून पाऊस पडत असला तरी उष्णतेने नागरिक हैराण झाले आहेत. येत्या शनिवारपर्यंत मुंबई आणि ठाणे शहरात उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

मुंबईतील सांताक्रूझ वेधशाळेत गुरुवारी कमाल ३६.९ अंश सेल्सिअस आणि किमान २८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सांताक्रूझ वेधशाळेत बुधवारी मुंबईचे तापमान ३३.९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले.

बुधवारच्या तुलनेत गुरुवारी शहराच्या तापमानात 2 ते 2.5 अंशांनी वाढ झाली. मुंबईत कुलाबा परिसरात ७९ टक्के, तर सांताक्रूझ परिसरात ७२ टक्के आर्द्रता नोंदवली गेली. मुंबईतील गुरुवारचे तापमान हे गेल्या १० वर्षांतील मे महिन्यातील दुसऱ्या क्रमांकाचे तापमान होते.

उच्च आर्द्रतेमुळे सध्या ३६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असली तरी गुरुवारी मुंबई शहरात ४० अंश सेल्सिअस असल्याचा अनुभव आला. कमाल तापमानात वाढ आणि आर्द्र हवेमुळे मुंबई, ठाणे आणि संपूर्ण कोकणात १४ मेपर्यंत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.


हेही वाचा

मुंबईतल्या 2 एअर क्वालिटी मॉनिटरिंग स्टेशनची नाव बदलली

पुढील बातमी
इतर बातम्या