Mumbai Temperature : पुढचे ४८ तास 'या' शहरांसाठी धोक्याचे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात अवकाळी पावसामुळं अनेक शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यात उकाड्याच्या त्रासाला समोरं जाव लागत आहे. बदलत्या हवामानामुळं नागरिकांच्या बिघाड होण्याची शक्यता आहे. असं असलं तरी आता नागरिकांसाठी पुढील ४८ तास धोक्याचे असल्याचा अंदाज हवमान विभागानं वर्तवला आहे. नवी मुंबई, मुंबई, कोकणात कडाक्याचं उन पडलं आहे.

पुढील ४८ तास उष्णतेची लाट मुंबईसह संपूर्ण कोकण प्रांतात कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. शुक्रवारसह शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. ईशान्य व उत्तरेकडून गरम व कोरड्या वाऱ्यांमुळं मुंबईसह पुढील २ ते ३ दिवसांत कोकणातील तापमानात वाढ होणार आहे असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

गुरुवारी दुपारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३९ अंश एवढा नोंदवण्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरात कमाल तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअस झाला आहे. पालघर इथं गुरुवारी दुपारी कमाल तापमान ४१ अंश नोंदवलं गेलं. यामुळं उन्हाचा पारा वाढून नागरिक त्रस्त झाले आहेत. हवामानातील उष्णता वाढत असल्यामुळं नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या