मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्यानं असा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, पुढील ३ ते ४ दिवसांत तुरळक ठिकाणी अति मुसळधार पावसाचीही शक्यता आहे.

पावसासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाल्याने गेले काही दिवस पावसाने ओढ दिली होती. त्यानंतर पुन्हा एकदा अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी येथे चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेले २ दिवस मुंबईत गारवा जाणवत आहे. सोमवारी कमाल तापमानात २ अंशांनी घट दिसून आली. कुलाबा इथं २७.८ व सांताक्रूझ इथं २८.१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

मागील अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानं मुंबईत उकाडा ही वाढला होता. त्यामुळं मुंबईकरांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं.

पुढील बातमी
इतर बातम्या