मुंबईकरांनो संभाळून! 19 ऑगस्टसाठी रेड अलर्ट जारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई आणि कोकण किनारपट्टी सध्या जोरदार पावसाच्या कचाट्यात सापडली आहे. हवामान विभागाने पुढील 48 तासांसाठी मुंबई, ठाणे आणि कोकणातील इतर जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.

नागरिकांनी अत्यंत सतर्क राहावे आणि कोणत्याही अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पावसामुळे शहराचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा सर्वाधिक फटका वाहतुकीला बसला आहे.

हवामान विभागाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसह पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या व कुटुंबाच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सोमवारी सकाळपासूनच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता. या परिस्थितीची दखल घेत मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी तात्काळ पालिकेच्या आयुक्तांना शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश दिले. ज्या विद्यार्थ्यांना सकाळीच शाळेत पाठवण्यात आले होते, त्यांना सुखरूप घरी पोहोचवण्याची व्यवस्था करण्याचे आदेशही त्यांनी दिले. या निर्णयामुळे पालक आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला मोठा दिलासा मिळाला आहे.


हेही वाचा

18 ऑगस्टला मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या