दिल्ली ब्लास्टनंतर मुंबईत हाय अलर्ट जारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी (10 नोव्हेंबरला)सायंकाळी झालेल्या हल्ल्याने राजधानी हादरली आहे. दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक 1 जवळ झालेल्या शक्तिशाली स्फोटात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

हा स्फोट प्रचंड तीव्रतेचा असून आजूबाजूचा परिसर आवाजाने हादरला. दिल्लीतील स्फोटानंतर आता मुंबई पोलीस एकदम अलर्ट मोडवर आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबईत हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दिल्लीतील स्फोटानंतर मुंबई पोलिसांकडून ठिकठिकाणी झडती घेण्यात आली. धार्मिक स्थळे, बाजारपेठा, हॉटेल्सची कसून तपासणी करण्यात आली.

तसेच गर्दीची ठिकाणं आणि धार्मिक स्थळांवर मुंबई पोलिसांकडून करडी नजर ठेवली जात आहे. दिल्लीतील हल्ल्यानंतर विशेष अलर्ट आल्याने मुंबई पोलीस अलर्ट मोडवर असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील हॉटस्पॉट मानले जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाला आता पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय निर्णय घेत बॉम्बस्फोट आणि दंगल नियंत्रण पथक महत्त्वाच्या ठिकाणी तैनात केली आहेत.

चर्चगेट, सीएसएमटी, दादर, वांद्रे या महत्त्वाच्या स्थानकांवर झाडाझडती सुरू झाली आहे. दिल्लीच स्पॉटनंतर मुंबई पोलिसांकडून अधिकची खबरदारी घेण्यास सुरुवात झाल्याचे दृश्य सध्या मुंबईत पाहायला मिळत आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या