दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ऐतिहासिक शिवाजी पार्क जिमखाना पुन्हा एकदा नव्या रंगात, नव्या ढंगात सुरू होतोय. नव्याने उभारलेल्या ‘हायटेक’ जिमखान्याच्या नूतन वास्तूचे उद्घाटन होणार झाले. आधुनिक रूप आणि अत्याधुनिक सुविधा पाहून क्रिकेटपटू, क्रिकेटप्रेमी आणि सदस्यांना सुखद धक्का बसणार आहे.
शिवाजी पार्क जिमखान्याला हेरिटेज लूक देण्यात आला असून त्यानुसार पुनर्बांधणी करताना आम्हाला काही बदल करावे लागले. खालच्या बाजूला असलेले तीन डिपार्टमेंट आम्ही वरच्या बाजूला शिफ्ट केले. रेस्टॉरंटची जागा आता आणखी मोठी झाली आहे. याशिवाय हेरिटेज लूकला साजेसे असे एक भलेमोठे घडय़ाळ आम्ही लावले आहे, अशी माहिती शिवाजी पार्क जिमखान्याचे असिस्टंट जनरल सेक्रेटरी सुनील रामचंद्रन यांनी दिली.
डिजिटल प्रवेश प्रणाली, अत्याधुनिक जिम, स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग, नवे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकर्षण इंटीरिअर करण्यात आले आहे. जिमखान्याचा चेहरामोहरा बदलला तरी आत्मा तोच आहे, असे जिमखान्याचे अध्यक्ष प्रवीण आमरे यांनी सांगितले.
1909 मध्ये ‘दादर हिंदू जिमखाना’ म्हणून सुरुवात झालेल्या या संस्थेने स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, असंख्य राजकीय घडामोडी आणि क्रिकेटसह अनेक खेळाडूंची जडणघडण जवळून पाहिली. विजय मांजरेकर, अजित वाडेकर, संदीप पाटील यांच्यासह क्रिकेटच्या पंढरीत वाढलेल्या या जिमखान्याने भारतरत्न सचिन तेंडुलकरलाही घडताना पाहिलेय.
दीड वर्ष बंद असलेल्या या जिमखान्याचा चेहरामोहरा बदलून डिजिटल प्रवेश प्रणाली, अत्याधुनिक जिम, स्मार्ट सेफ्टी मॉनिटरिंग, नवे स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर आणि आकर्षक इंटेरियर यामुळे 116 वर्षांचा जिमखाना हायटेक झाला आहे.
1909 साली हा जिमखाना सुरू झाला त्यावेळेस त्याचे नाव ‘दादर हिंदू जिमखाना’ असे होते. पुढे ‘माहीम पार्क’चे नाव शिवाजी पार्क झाल्यानंतर या जिमखान्याचे नाव ‘शिवाजी पार्क जिमखाना’ झाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा जिमखाने ही फक्त ब्रिटिशांची मक्तेदारी होती आणि मुंबईतले इतर जिमखाने हे आंग्लाळलेल्या संस्कृतीची प्रतीके होती तेव्हा दिमाखाने ‘दादर हिंदू जिमखाना’ आणि पुढे ‘शिवाजी पार्क जिमखाना’ नाव मिरवणारा हा जिमखाना.
अनेक खेळाडू घडताना पाहिले. विजय मांजरेकर, सुभाष गुप्ते, अजित वाडेकर, संदीप पाटील तसेच अनेक खेळाडूंना जवळून पहिले. दादर-माहीम परिसर हा सांस्कृतिकदृष्टय़ा संपन्न राहिला तो या भागातील अनेक थोर साहित्यिकांच्या आणि कलाकारांच्या वास्तव्यामुळे.