वरंधा घाटात भीषण अपघात, कार धरणात कोसळली

Representatives photo, file photo
Representatives photo, file photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वरांधा घाटात भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातून वरांधा घाट मार्गे कोकणात जाणारी एक चारचाकी नीरा देवधर धरणात कोसळली आहे. या कारमधून चौघेजण प्रवास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

भोर महाड मार्गावरील वरंधा घाटात शिरगाव गावच्या हद्दीत एक मोटार निरा देवघर धरणाच्या पाण्यात पडली.

शनिवारी तारीख २९ जुलै रोजी पहाटे ही दुर्घटना घडली आहे. गाडीत तीन पुरुष आणि एक महिला असे चौघेजण होते. त्यापैकी एक जण बचावला आहे. तिघेजण बुडाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अपघातग्रस्त हे पुण्यातील रावेत येथील असल्याचे समजते. शासनाचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, भोरमधील सह्याद्री रेस्क्यू टीमचे सदस्य आणि भोईराज मंडळाचे सदस्य हे पोलिसांसमवेत घटनास्थळी रवाना झालेले आहेत.

पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र घाट बंद असताना काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. 


पुढील बातमी
इतर बातम्या