अनधिकृत बांधकामांवर महापालिकेचा हातोडा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चिराबाजार - येथील अनधिकृत बांधकामावर गुरूवारी महापालिकेने हातोडा मारत संपूर्ण बांधकाम तोडले. या बांधकामाबाबत जागा मालक आणि बांधकाम करणारे ट्रस्ट यांच्यात 2 वर्षांपासून जागेबाबत वाद सुरू होता. या जागेवर बांधल्या जाणाऱ्या बांधकामाला जागा मालकाचा विरोध होता. तर काही चाळ रहिवाशांची देखील सदर जागेवरील बांधकामाबाबत तीव्र नाराजी होती. रहिवाशांना ये-जा करताना या बांधकामाचा त्रास होत होता. विशेष म्हणजे ट्रस्टवाल्यांनी या भागात लहान असलेले बांधकाम जागा मालकाला न जुमानता वाढवले. अखेर महापालिकेने हस्तक्षेप करूनही ट्रस्ट मालक ऐकत नसल्याने सदर जागांबाबत हायकोर्टाने मध्यस्थी करत अशी बांधकामे तोडण्याचे आदेश दिले. महापालिकेने दोन आठवड्यापूर्वी पुन्हा समन्स बजावत हे बांधकाम तोडले.

दरम्यान ट्रस्ट मालकांनी संबंधित जागेवरील बांधकाम अधिकृत असून, बांधकाम तोडता येऊ नये म्हणून हायकोर्टात याचिका दिली होती. पण ट्रस्टकडे कोणतेही पुरावे नसल्याने ही याचिका फेटाळून लावण्यात आली. या कारवाई दरम्यान सी वॉर्डचे सहाय्यक आयुक्त जीवक घेवडमल, कनिष्ठ अभियंता एस. के. म्हात्रे आणि पोलीस सहाय्यक आयुक्त विनोद सावंत उपस्थित होते.

पुढील बातमी
इतर बातम्या