बस स्टॉपला अनधिकृत पार्किंगचा वेढा

  • अर्जुन कांबळे & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अंधेरी - टेकवेब सेंटर, न्यू लिंक रोडवर बस स्टॉप आणि परिसर पार्किंगनं घेरला गेलाय. एस. व्ही. रोड आणि लिंक रोड मेन जंक्शन असल्यानं इथे नेहमीच गर्दी असते. स्टॉपवर अतिक्रमण करून उभ्या केल्या जाणाऱ्या वाहनांमुळे प्रवाशांना मात्र त्रास होतोय. या जंक्शनवर केव्हाही अपघात होण्याची भीती व्यक्त केली जातेय. मात्र महापालिका आणि वाहतूक पोलीसही त्याकडे दुर्लक्षच करतायत. या संदर्भात बस स्टॉपशेजारचे टेलिफोन स्टॉल धारक विजय गावडे म्हणाले की, गेल्या वर्षी अपघातात शाळकरी विद्यार्थी आणि काजूपाड्यातल्या एकाचाही बळी गेला होता. अंधेरी वाहतूक पोलीस अधिकारी चंद्रकांत थळे या संदर्भात म्हणाले की, चौकशी करून तातडीनं योग्य ती कारवाई करण्यात येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या