वसई-विरार किनारपट्टी आणि खाडी क्षेत्रात बेकायदेशीर रित्या वाळू उत्खनन (sand mining) मोठ्या प्रमाणावर होते. या वाळू उत्खननामुळे खाडी आणि किनारपट्टीची खोली वाढते. तसेच अतिरिक्त वाळू उत्खननामुळे येथील जैवविविधतेला देखील हानी पोहोचत आहे.
मागील काही वर्षांपासून होणाऱ्या वैतरणा खाडीतील वाळू उत्खननामुळे विरार ते डहाणू (dahanu road) दरम्यान असणाऱ्या वैतरणा (vaitarna) खाडीवरील रेल्वे पुल धोक्यात असल्याचे म्हटले जात होते.
या वाळू उत्खननाकडे दुर्लक्ष होत असल्याने येथील वाळू माफिया मोकाट सुटले आहेत. तसेच वाळू माफियांकडून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत आहे.
वसई-विरार किनारपट्टी आणि खाडी क्षेत्रात बेकायदेशीर वाळू उत्खनन सुरूच आहे. या बेकायदेशीर कामांवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाने मोहीम सुरू केली आहे.
विरार (virar) महामार्गाजवळील खानिवडे (khaniwade) गावात एका वाळू उत्खनन स्थळावर कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांनी 70 ब्रास वाळू जप्त केली.
यापूर्वी वारंवार कारवाई करून आणि वाळू माफियांना इशारा देऊनही, परिसरात बेकायदेशीर उत्खनन सुरूच आहे.
अलिकडच्याच कारवाईदरम्यान, पाच बेकायदेशीर वाळू उपसा करणारे खड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आणि जप्त केलेली 70 ब्रास वाळू पुन्हा नाल्यात ढकलण्यात आली.
हेही वाचा