मुंबईकरांसाठी २९ तारीख अनलकी?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई ही स्वप्नांची मायानगरी म्हणून अोळखली जाते. या मायानगरीत काहींची स्वप्न पूर्ण होतात, तर काहींची स्वप्न धुळीस मिळतात. क्षणार्धात एखाद्याला शिखरावर पोहोचवणारी मुंबई अाता तितकीच धोकादायकही बनू लागली अाहे. २०१७ मध्ये मुंबईत अनेक दुर्दैवी घटना घडल्या, त्यात अनेकांना प्राण गमवावे लागले. हे वर्ष संपता संपता संपता मुंबईत आणखी एक दुर्दैवी घटना घडली आहे. मुंबईतल्या लोअर परेल भागातील कमला मिल्स गुरुवारी मध्यरात्री कम्पाउंडमधील एका रेस्टॉरंटला आग लागली. फक्त हीच दुर्घटना नाही तर वर्षभरात अशा अनेक घटना घडल्या आहेत. ज्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे हे वर्ष मुंबईत घडलेल्या दुर्घटनांसाठी ओळखले जाऊ लागलं आहे. अशाच काही घटनांचा 'मुंबई लाइव्ह'नं घेतलेला आढावा... 

 

२६ जुलै २०१७

घाटकोपरमधली एलबीएस रोडवर श्रेयस सिनेमाजवळील सिद्धी साई ही चार मजली इमारत कोसळली. एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत १७ जणांनी आपला जीव गमावला. सुमारे ४० वर्षांपूर्वीची ही इमारत होती. या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या नर्सिंग होमचं नुतनीकरण सुरू होतं. अशातच ही अख्खी इमारत कोसळली. या इमारतीत १२ कुटुंब राहत होते. मनपानं ही इमारत धोकादायक असल्याची नोटीस देखील बजावली होती.

२९ आणि ३० ऑगस्ट

दोन दिवस पडणाऱ्या पावसानं मुंबईकरांना बेहाल केलं. पावसामुळे मुंबईकरांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. या पावसात १൦ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक नागरिक आजारी पडले. पावसामुळे महाराष्ट्र सरकारनं स्कूल आणि कॉलेज बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. दोन दिवसाच्या पावसामुळे रेल्वे आणि बेस्ट सेवांवर परिणाम झाला होता. २०० हून अधिक जागांवर झाडं आणि विजेचे खांब पडल्याची माहिती देखील समोर आली होती

३१ ऑगस्ट २०१७

भेंडी बाजारमधली हुसैनी इमारत ही ५ मजली इमारत कोसळली. यात ३३ जणांचा मृत्यू झाला तर २० हून अधिक जखमी झाले होते. हुसैनी इमारतीत ५ कुटुंब राहत होते.२०११ साली हुसैनी इमारतीची गणना धोकादायक इमारतीत झाली. पण तिथले लोक मात्र घर सोडून जायला तयार नव्हते.

२९ सप्टेंबर २०१७

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवरील फुट ओवर ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीत २३ लोकांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झाले. २९ सप्टेंबरला सकाळी ९.३० च्या सुमारास पावसाची मोठी सर आली. त्याचवेळी मध्य रेल्वेवरील परेल आणि पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन स्टेशनवर एकाचवेळी लोकल आल्या. त्यामुळे बाहेर पडणाऱ्या पाजचारी पुलावर गर्दी झाली. अचानक गर्दीतून कुणी तरी पादचारी पूल पडणार असल्याची अफवा पसरली. लोकांची धावपळ सुरू झाली. लोक मिळेल ती जागा पकडून बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागले. यात ३३ जणांचा मृत्यू झाला

१७ डिसेंबर २०१७ 

साकिनाका इथल्या खैराणी रोडवर भानू फरसाण या दुकानाला सकाळी ४.३० वाजता आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली.या आगीमध्ये दुकानात झोपलेल्या १२ कामगारांचा मृ्त्यू झाला. आग लागल्यानंतर शेजारील कारखान्यांमधील कामगारांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला.पण आग आणखी पसरली आणि यात १२ जणांचा आपले प्राण गमवावे लागले.अनधिकृत रित्या हे दुकान चालवलं जात असल्याचं समोर आल्यानंतर दुकानाच्या मालकाला अटक करण्यात आली

७ डिसेंबर २०१७

जुहूमधल्या एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सिलिंडर फुटल्यानं ६ कामगारांचा मृत्यू झाला.तर यात ११ कामगार जखमी झाले.

२९ तारीखेलाच काळाचा घाला

२०१७ वर्षभरात अनेक दुर्घटना घडल्या. पण २९ तारीख ही मुंबईकरांच्या आयुष्यात काळा दिवस ठरली,असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. यावर्षी २९ तारखेला मुंबईत तीन मोठ्या घटना घडल्या

  1. २९ ऑगस्टला पडलेल्या पावसानं मुंबईकरांना चांगलंच झोडपलं. या दिवशी विविध घटनांमध्ये १० जणांचा बळी गेला
  2. त्यानंतर मुंबईकरांसाठी दुसऱ्या महिन्यातील २९ तारीख देखील वाईट ठरली. २९ सप्टेंबरला परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी झाली. यात २३ प्रवाशांचा मृत्यू झाला
  3. परळ-एलफिन्स्टन रेल्वे स्थानकावरील दुर्घटनेला तीन महिने पूर्ण होत नाहीत तोच मुंबईत आणखी एक दुर्घटना घडली आणि तीही २९ तारखेलाच. लोअर परेल कम्पाऊंडमध्ये मोजो टेरेस पब आणि वन अबोव्ह पबला आग २९ डिसेंबरच्या मध्यरात्री आग लागली. यात १४ जणांचा मृत्यू झाला. यात ११ महिलांसह ३ तरूणांचा समावेश आहे.

या तिन्ही घटना वेगवेगळ्या महिन्यात झाल्या आहेत आणि तेही २९ तारखेलाच. त्यामुळे ही २९ तारीख मुंबईकरांसाठी अनलकी तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होतो

पुढील बातमी
इतर बातम्या