धारावीच्या स्मशानभूमीत आधुनिक चिमणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावी - गेल्या अनेक दशकांपासून लांबणीवर पडलेल्या हिंदू स्मशानभूमीचा मुख्य मुद्दा मंगळवारी मार्गी लागल्याचे दिसून आले. मुंबई महानगर पालिकेच्या वतीने धारावीतील हिंदू स्मशानभूमीत बसवण्यात आलेल्या आधुनिक चिमणीचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. माजी स्थापत्य समिती अध्यक्ष, माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी, स्थानिक नगरसेवक टी. एम. जगदीश, नगरसेवक वसंत नकाशे, शाखाप्रमुख आनंद भोसले, पालिका जी उत्तर विभागाचे स्वच्छता निरीक्षक हुलचंद्र पाटील, कंत्राटदार तसेच स्मशानालगत राहणाऱ्या अनेक रहिवाशांच्या उपस्थित मंगळवारी हे प्रात्याक्षिक दाखवण्यात आले.

गेल्या दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेवक राजेंद्र सूर्यवंशी यांनी स्मशानभूमी लगतच्या परिसराचा आढावा घेतला होता. या गंभीर समस्यांमधून पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी धारावी स्मशानभूमीला अद्ययावत करण्यासाठी पालिकेच्या अर्थसंकल्प निधीतून करोडो रुपयांचा फंड पास करून घेतला. त्या फंडमधून एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी वापरून पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी सुमारे 100 फूट उंच चिमणी बांधली. त्याच्या प्रात्यक्षिकाचे सफल आयोजन मंगळवारी स्थानिकांसमोर करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक सूर्यवंशी म्हणाले की या चिमणीमुळे पर्यावरणाचे संवर्धन होणार असून दुर्गंधीतून नागरिकांची सुटका झाली आहे. यापुढे या स्मशानभूमीला अद्ययावत बनवण्याचे काम सुरू राहणार आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं.

पुढील बातमी
इतर बातम्या