वाहन फिटनेस तपासणी शुल्कात (vehicle fitness fee) वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय रस्ते आणि महामार्ग खात्याने घेतला आहे. केंद्रीय मोटार वाहन नियमावलीचे सुधारित दर तत्काळ लागू झाले आहेत.
मुंबईसह (mumbai) राज्य (maharashtra) आणि देशभरात (india) नव्या शुल्क रचनेनुसार वाहन (vehicles) किती जुने आहे यानुसार दर निश्चित केले गेले आहेत. 20 वर्षांहून अधिक जुन्या वाहनांसाठी सर्वाधिक शुल्क लागू होणार आहे.
दुचाकी, ऑटो/टॅक्सी, एलएमव्ही/एलजीव्ही आणि जड वाहनांसह सर्व श्रेणींवर हे नवीन दर लागू होतील.
15 वर्षांहून जुन्या वाहनांसाठी लागू असलेला आधीचा सर्वाधिक शुल्क आता 10 वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांना लागू होणार आहे.
नव्या संरचनेत सरकारने तीन टप्पे तयार केले आहेत. 10 ते 15 वर्षे, 15 ते 20 वर्षे आणि 20 वर्षांपेक्षा जास्त असे तीन टप्पे आहेत. यात प्रत्येक गटानुसार शुल्क वाढत जाते. यापूर्वी 15 वर्षांवरील सर्व वाहनांसाठी एकसमान दर होता.
नवीन स्लॅबमध्ये दुचाकी, तीनचाकी, क्वाड्रिसायकल, हलकी मोटार वाहने आणि मध्यम तसेच जड व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. यामध्ये जड व्यावसायिक वाहनांना सर्वात जास्त आर्थिक फटका बसणार आहे.
20 वर्षांपेक्षा जुने ट्रक आणि बसेस यांच्या फिटनेस तपासणीचे शुल्क आता 2500 वरून 25 हजार रुपये झाले आहे. याच वयोगटातील मध्यम व्यावसायिक वाहनांचे शुल्क 1800 रुपयांवरून 20 हजार रुपये करण्यात आले आहे.
20 वर्षांवरील एलएमव्हीसाठी शुल्क 15 हजार रुपये, तीनचाकींसाठी 7 हजार रुपये आणि 20 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या दुचाकींसाठी 600 रुपयांवरून 2 हजार रुपये वाढवण्यात आले आहे, असे अधिसूचनेत पुढे नमूद केले आहे.
15 वर्षांखालील वाहनांसाठी शुल्कवाढ लागू झाली आहे. दुचाकींसाठी फिटनेस चाचणी 400 रुपये, एलएमव्हीसाठी 600 रुपये आणि मध्यम आणि जड व्यावसायिक वाहनांसाठी 1 हजार रुपये आकारले जाणार आहेत.
नवीन पद्धतीत वाहनाच्या वयानुसार शुल्कात मोठी वाढ करण्यात आली आहे. 20 वर्षांवरील वाहनांसाठी सर्वाधिक दर लागू आहेत. दुचाकी, ऑटो/कॅब, लाइट मोटार वाहन आणि जड वाहने आदी सर्वच श्रेणींवर हे बदल लागू होणार आहेत.
हेही वाचा