रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी माहिती दिली की भारतातील पहिली बुलेट ट्रेन (bullet train) 15 ऑगस्ट 2027 रोजी सुरू होईल.
तसेच मुंबई (mumbai)-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरवरील (high-speed rail corridor) सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होतील.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, "बुलेट ट्रेन 2027 मध्ये, 15 ऑगस्ट 2027 रोजी तयार होईल."
तसेच ते पुढे म्हणाले की,"पहिला विभाग सुरत ते बिलीमोरा असणार असेल.त्यानंतर वापी ते सुरत टप्पा सुरू करण्यात येईल. त्यानंतर वापी ते अहमदाबादचा टप्पा सुरू होईल. तसेच त्यानंतर ठाणे ते अहमदाबाद आणि त्यानंतर मुंबई ते अहमदाबाद (Mumbai-Ahmedabad corridor) पूर्ण सेवा सुरू करण्यात येईल."
अहमदाबादमधील साबरमती आणि मुंबई दरम्यान बांधण्यात येणारा 508 किलोमीटर लांबीचा हाय-स्पीड (speed) रेल्वे कॉरिडॉर ताशी 320 किमी वेगाने धावणाऱ्या गाड्यांसाठी डिझाइन केलेला आहे.
एकदा पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर, बुलेट ट्रेन संपूर्ण अंतर 2 तास 17 मिनिटांत पूर्ण करेल. या प्रकल्पाची पायाभरणी 2017. मध्ये झाली होती.
बुलेट ट्रेनचा टप्पा मूळतः डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते. तथापि, भूसंपादन आणि इतर आव्हानांमुळे प्रकल्पाला विलंब झाला.
हेही वाचा