एका आठवड्यात देशात ३२ टक्के रूग्णवाढ

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

सध्या देशभरात कोरोना रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. एका आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत ३२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामध्ये १.९ लाख रूग्ण म्हणजेच ६५ टक्क्यांहून अधिक नव्या रुग्णांची नोंद  केरळमध्ये झाली. आता भारतात गेल्या २४ तासांत तब्बल ४२ हजार ९०९ नव्या रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आता  प्रत्येकानं खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.

देशात रविवारी ३८० जणांने कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. गेल्या २४ तासांत ३४ हजार ७६३ कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडले आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.५१ टक्क्यांवर आहे. आतापर्यंत कोरोनातून ३ कोटी १९ लाख २३ हजार ४०५ रुग्ण बरे झाले आहेत.

गेल्या २४ तासांत देशात ३२ लाख १४ हजार ६९६ जणांना करोनाची लस देण्यात आली आहे.यासह एकूण लसीकरण ६३.४३ टक्क्यांवर झालं आहे. फक्त देशातचं नाही तर महाराष्ट्रात देखील नवीन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. रविवारी महाराष्ट्रात ४ हजार ६६६ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

रविवारी राज्यात एकून १३१ जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. तर, ३ हजार ५१०  रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर सध्या ९७ टक्क्यांवर आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या