कोरोना योद्धांना भारतीय वायूसेनेची मानवंदना, हॅलिकॉप्टरमार्फत रुग्णांलयांवर पुष्पवृष्टी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोविड 19 या महामारीशी लढणाऱ्या पोलिस, डाँक्टर, आरोग्य कर्मचारी सफाई कामगार आणि अत्यावश सेवा बजवणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक अनोखी सलामी देशाच्या तीन ही दलाने रविवारी सकाळी दिली. वायू दलाने मुंबईतील सर्व हॉस्पिटल्स वर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवर्षाव करण्यात आला. तर भारतीय जवान आणि नौदलाकडून विविध कार्यक्रम आयोजन करत, या सेवेकऱ्यांचे कौतुक केले. कोरोना योद्धांना दिलेली ही सलामी नक्कीच त्यांचे कोरोना संकटाविरुद्ध लढण्याचे बळ वाढवेल. 

मुंबईतील कस्तुरबा आणि जे. जे. रुग्णालयांवरही पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. तर मारिन ड्राइव्हवर फायटर विमानांनी कोरोना योद्धांना सलामी देण्यात आली.नुसते मुंबईतच नाही तर, दिल्ली, जयपूर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊमध्ये लढाऊ विमाने फ्लाय पास्ट करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर श्रीनगर, चंडीगढ, दिल्ली, जयपूर, भोपाळ, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, कोईम्बतूर आणि तिरुअनंतपुरममध्ये हवाई दलाची वाहतूक विमाने फ्लाय पास्ट करणार आहेत. 
इंडियन एअर फोर्सतर्फे फ्लाय पास्टचे आयोजन करण्यात आले आहे. काश्मीरपासून ते कन्याकुमारी आणि आसामपासून ते कच्छपर्यंत असे दोन फ्लायपास्ट करण्यात येणार आहे. तिन्ही दलांच्या जवानांकडून कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णालयांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी दिली. 

पुढील बातमी
इतर बातम्या