मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह राज्यभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दररोज १०००हुन अधिक लोकांना कोरोनाची लागण होत आहे. अशातच आता भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याला ही कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनानं हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे.

माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवत आहेत. माझ्या घरातील इतर सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. मी घरातचं क्वारंटाईन आहे. तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व खबरदारी मी घेत आहे, असं सचिनने म्हटलं आहे.

सचिन तेंडुलकर नुकताच रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये खेळला. या स्पर्धेत त्याने धुवांधार बॅटिंग केली. सेहवागच्या साथीने सलामीला मैदानात येत त्याने इंडिया लिजेंड्सला स्पर्धेतील मॅच जिंकवून देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. भारतीय संघाने या स्पर्धेत विजय मिळवला. भारताने श्रीलंकेला १४ धावांनी हरवून, ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या

राज्यात काल २६ मार्चला दिवसभरात ३६'९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण १७.०१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३,०००,५६ रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. काल दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६,३७,७३५ वर पोहोचला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या