महिलांसाठी पहिलं फिरतं वॉशरूम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. हे स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील.

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती यांच्या संकल्पनेतून या प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली. झोपडपट्टीमधील भगिनींना सदर स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. 

मंत्री लोढा म्हणाले, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरते. त्यामुळे त्यांचा त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचा प्रकल्प राबवला आहे'.

या प्रकल्पासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मंत्री मंगल प्रभात यांनी मानले. मी सर्वांना आवाहन करतो की, या प्रकल्पाचा उपयोग करावा. इतर ठिकाणी देखील सदर प्रकल्प राबवू'.

मंत्री मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले, 'महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आलंय. या बसमध्ये एकूण 5 स्नानगृहे आहेत. त्यात शॉवर देखील आहे.' 

बसमध्ये 2100 लिटर इतक्या लिटर पाण्यची क्षमता आहे. या स्नानगृहासहित बेसिन आणि इतर आवश्यक सुविधांचाही समावेश आहे. या बसमध्ये महिलांना कपडे वाळवण्यासाठी 2 ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी जनरेटर्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.


हेही वाचा

सर्व बोर्डांवरील शाळांमध्ये मुख्य विषय म्हणून मराठीची अंमलबजावणी

2024 मध्ये 70,000 हून अधिक बेकायदेशीर बॅनर, पोस्टर्स हटवले

पुढील बातमी
इतर बातम्या