नौदलातील आयएनएस कारवार आणि आयएनएस काकीनाडा नावाच्या दोन सुरुंग नाशक जहाजांना मंगळवारी सेवेतून निवृत्त करण्यात आलं. नौदल प्रमुख अॅडमिरल सुनील लांबा यांच्या उपस्थित या दोन्ही जहाजांना सेवानिवृत्त करण्यात आलं. अॅडमिरल सुनील लांबा हे आयएनएस काकीनाडाचे दुसरे कमांडिंग ऑफिसर राहिल्याने त्यांचं या जहाजाशी एक वेगळच नातं होतं. या दोन्ही बोटींनी आजपर्यंत अगणित समुद्री सुरुंग शोधून काढले असून, सुरुवातीला ही दोन्ही जहाजं जुन्या स्वीप तंत्रज्ञानाचा वापर करत होती. जहाजांच्या नुतनीकरणांनंतर 'साईड स्कॅन सोनार'च्या मदतीने त्या आपलं ऑपरेशन पार पाडत असत.
आयएनएस काकीनाडा (M70)ही 'नाट्य' वर्गातील दुसरी सुरुंगनाशिका असून, ती देखील 1986 साली भारतीय नौदलात दाखल झाली होती. तिचे पहिले कमांडिंग ऑफिसर हे लुटेनंट कमांडर सतीश सोनी होते तर कमांडर अमरजित सिंग युमनम हे या बोटीचे शेवटचे कमांडिंग ऑफिसर होते. भारतीय नौदलात दाखल झाल्यावर या दोन्ही बोटी विशाखापट्टणम येथून ऑपरेट होत असून, 2013 साली त्यांना मुंबईला हलवण्यात आलं होतं.