महापालिका शाळांत सीसीटीव्ही का नाही? शिक्षण समिती अध्यक्षांनी घेतले फैलावर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सुरक्षेच्या मुद्दयावरून शिक्षण समितीने प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले आहे. सर्व खासगी शाळांना सीसीटीव्ह कॅमेरे लावण्याची सक्ती केली जाते, मग महापालिकेच्या शाळांमध्ये हे कॅमेरे का लावले जात नाही? असा सवालच सदस्यांनी केली. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये त्वरीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी प्रशासनाला दिले.

सुरक्षा रक्षक, केअर टेकरच्या वर्तनावर शंका

मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सुरक्षेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी शिक्षण समितीच्या बैठकीत हरकतीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी महापालिकेच्या शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याची बाब मांडत त्यांनी शाळांमधील सुरक्षा रक्षक आणि केअर टेकर यांच्या वर्तनाबाबत शंका उपस्थित केली. यावेळी सर्वच सदस्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची गरज असून सुरक्षा रक्षकांची नेमणूक करताना पोलिसांच्या पडताळणीनंतरच त्यांची नियुक्ती केली जावी, अशी सूचना केली.

याच वर्षात लावा कॅमेरे

महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावणे आवश्यक असून प्रशासनाने हे कॅमेरे याच आर्थिक वर्षात बसवावे, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्षा शुभदा गुडेकर यांनी दिले आहेत. हे कॅमेरे प्रत्येक शाळांमध्ये बसवताना ते वर्गनिहाय बसवावेत की प्रवेशद्वारांवर याचाही त्वरीत अहवाल तयार करण्याचेही आदेश दिले.

पोलिसांचे प्रमाणपत्रक आवश्यक

याशिवाय शाळांमध्ये सुरक्षा रक्षक नेमताना, तसेच स्वच्छतेसाठी कर्मचारी नेमताना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही याची खातरजमा करण्यासाठी पोलिसांचे प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे, अशाही सूचना त्यांनी केल्या.


हेही वाचा -

सर्व रुग्णालयांत सीसीटीव्ही बसवा - डॉ. दीपक सावंत


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)   

पुढील बातमी
इतर बातम्या