आता काळी-पिवळी टॅक्सी चालकही आक्रमक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ओला, उबर या अॅप बेस्ड टॅक्सी सेवेच्या चालक-मालकांच्या संपानंतर आता काळी-पिवळी टॅक्सी चालक आपल्या मागण्यांसाठी आक्रमक होणार आहेत. काळी-पिवळी टॅक्सी चालकांच्या परवान्यांचे नुतनीकरण होत नसल्यामुळे सर्व टॅक्सी चालक १५ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत. त्यामुळे काळी-पिवळी टॅक्सी सेवा एक दिवस बंद राहणार आहे.

टॅक्सी चालकांचे हाल

मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला २५० मीटरची टेस्टिंग ट्रॅक उपलब्ध करून देण्यास सांगितलं होतं. परंतु, राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. परवान्यांचे नुतणीकरण होत नसल्यामुळे दररोज २०० ते २५० टॅक्सी बंद पडत आहेत. त्यामुळे ६ हजार टॅक्सी आणि १२ हजार टॅक्सी चालकांचे हाल होत आहेत.

जर १५ तारखेच्या आत सरकारने टॅक्सीबाबत निर्णय घेतला नाही तर सर्व टॅक्सी चालक मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याजवळ गाड्या नेतील, असं मुंबई टॅक्सी युनियनचे जनरल सेक्रेटरी ए. एल. क्वॉड्रेक्स यांनी सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या