नॅशनल पार्कमधील मादी बिबट्याचा मृत्यू

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बोरिवली - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 18 वर्षीय मादी बिबट्या कृष्णाचा वृद्धपकाळाने रविवारी पहाटे दोन वाजता मृत्यू झाला. कृष्णाच्या छातीत संसर्ग झाला होता. गेल्या पाच दिवसांपासून तिच्या शरीरावर फोडी उठल्या होत्या. वैदकीय तज्ज्ञ डॉक्टर शैलेश पेठे यांनी हे निदान केले. गेल्या दोन दिवसांपासून तिने खाणेपिणे बंद केले होते. त्यामुळे सलाईन लावून तिच्यावर उपचार सुरू होते. शनिवारी कृष्णाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजताच उद्यानातील कर्मचारी-अधिकाऱ्यांनी तिच्या भेटीसाठी धाव घेतली.

1999 मध्ये कृष्णाला कोकणातून आपल्या तीन महिन्यांच्या बछड्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले होते. पर्यटकांची सर्वात आवडती बिबट्या मादी अशी तिची प्रचिती होती, असे व्याघ्र प्रकल्प अधिकारी शैलेश देवरे यांनी सांगितले. 2014 साली कृष्णाचा साथीदार राजा बिबट्या मृत्यू पावला. त्यानंतर ती एकलकोंडी झाल्याचेही देवरे यांनी सांगितले.

कृष्णाचे शवविच्छेदन सोमवारी करण्यात येणार आहे. बुधवारी शवविच्छेदन अहवाल आल्यावर तिच्यावर अंत्यविधी करण्यात येतील, अशी माहिती देवरे यांनी दिली.

पुढील बातमी
इतर बातम्या