कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी परिसर ३ मे पर्यंत १०० टक्के बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढत आहेत. त्यामुळं खबरदारीचा उपाय म्हणून मुंबईतील कुर्ला, चेंबूर, चुनाभट्टी परिसर ३ मे पर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. मेडिकल, दूध आणि केबल हे फक्त सुरु राहणार आहे. शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी हा उपक्रम राबवला आहे.

कोरोनावर मात करण्यासाठी १०० टक्के लॉकडाऊनचा प्रयत्न आहे. किराणा धान्य दुकानदारांनी फोनवर ऑर्डर घेऊन सोसायटीपर्यंत डिलिव्हरी केली जाणार आहे. तर भाजी सोसायटीच्या आवारातच आणण्यास परवानगी मिळाली आहे.

राज्यात सोमवारी कोरोनाच्या ५२२ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८५९० असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, राज्यात सोमवारी २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूपैकी १५ जण मुंबईचे तर पुण्यातील ४ आणि अमरावती शहरातील ६ तर जळगाव आणि औरंगाबाद येथील येथील प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

पुढील बातमी
इतर बातम्या