‘लाडकी बहिण’ योजनेतील e-KYC दुरुस्तीची मुदत या तारखेपर्यंत वाढवली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुख्यमंत्री ‘लाडकी बहिण’ योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. e-KYC दुरुस्तीची मुदत आता 30 एप्रिल 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली.

मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रियेची अंतिम मुदत 31 मार्च 2026 होती. मात्र राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीच्या पार्श्वभूमीवर तसेच लाभार्थी महिलांच्या मागणीनुसार ही मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Ajit Pawar) यांच्या सल्ल्यानुसार घेण्यात आला.

जास्तीत जास्त पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळावा आणि कोणत्याही महिलेला अडचण येऊ नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

ज्या महिलांच्या अर्जामध्ये चुका आहेत, e-KYC अपूर्ण आहे, माहिती चुकीची भरली गेली आहे किंवा तांत्रिक अडचणी आल्या आहेत, अशा महिलांना आता दुरुस्ती करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे. त्यांनी आपली e-KYC प्रक्रिया 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.


हेही वाचा

MSRTC कडून NCMC स्मार्ट कार्डची सुरुवात

पुढील बातमी
इतर बातम्या