लागबागमध्ये सिलेंडरचा स्फोट, १६ जण होरपळले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील (Mumbai) लालबाग (lalbaugcha) परिसरात एका इमारतीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या स्फोटात १६ जण जखमी झाले असून जखमींना तातडीने केईएम रुग्णालयात (kem hospital) दाखल करण्यात आले आहे.

लालबाग इथे  गणेश गल्ली परिसरातील साराभाई इमारतीत आज सकाळी ७ च्या सुमारास ही घटना घडली. या इमारतीच्या एका बंद खोलीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून गॅस गळती होत होती. याबद्दल स्थानिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानंतर गॅस गळतीचा वास कुठून येतो हे पाहण्यासाठी स्थानिक आणि अग्निशमन दलाचे अधिकारी इमारतीत गेले असता अचानक स्फोट झाला.

आगीचा अचानक भडका उडाल्यामुळे १६ जण जखमी झाले आहे.  यात ३महिला आणि १० पुरुषांचा समावेश आहे. जखमींपैकी काही जणांवर केईम अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.  तर चार जणांवर ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केईम रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची विचारपूस केली.

पुढील बातमी
इतर बातम्या