आरेमध्ये सापडला बिबट्याचा बछडा, आईचा शोध सूरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
01/8
02/8
मंगळवारी आरे दूध वसाहतीतील पूर्वीच्या मेट्रो कारशेडच्या जागेजवळ बिबट्याचा बछडा आढळून आला. आरेच्या युनिट २२ इथून बिबट्याचा बछडा रेस्क्यू करण्यात आला. बछड्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याच्या आईचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. बछड्याची आई त्याला घेऊन जाते का हे बघण्यासाठी त्याला त्याच ठिकाणी ठेवलं जाणार आहे. सध्या पूर्नमिलनाचा प्रयत्न सुरू आहे.
03/8
सुमारे दोन महिने वयाच्या बिबट्याचे पिल्लू मंगळवारी संध्याकाळी आरे मिल्क कॉलनीतील पूर्वीच्या मेट्रो कार शेड परिसरातून स्थानिक रहिवाशांनी शोधून काढले. कुत्र्यांच्या भुंकण्यानं रहिवासी सतर्क झाले. तपेश्वर मंदिराच्या मार्गावर मेट्रो कार शेड जिथे असणार आहे त्या परिसराची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी बछड्याला पाहिलं. वन विभागाचे अधिकारी, स्थानिक पोलीस आणि स्वयंसेवकांना यानंतर कळवण्यात आलं.
04/8
वन अधिकाऱ्यांनी स्थानिकांना काही दिवस सतर्क राहण्यास सांगितलं आहे. कारण आई त्याच ठिकाणी असलेल्या पिल्लाच्या शोधात असेल अशी अपेक्षा आहे. एका पशुवैद्यकालाही या बछड्याची तपासणी करण्यास सांगितलं आहे. बछड्याला मूळ ठिकाणाहून हलवलं जाईल आणि त्याला वैद्यकीय मदत आवश्यक असल्यास बचाव केंद्रात नेलं जाईल.
05/8
सुमारे दोन महिने वयाच्या बिबट्याचे पिल्लू मंगळवारी संध्याकाळी आरे मिल्क कॉलनीतील पूर्वीच्या मेट्रो कार शेड परिसरातून स्थानिक रहिवाशांनी शोधून काढले. बछड्याच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी आणि त्याच्यावर कोणत्याही प्राण्यानं हल्ला होणार नाही याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी कॅमेरे बसवले आहेत. शावक आईनं तिथेच सोडले होते हे अधिकारी नाकारत नाहीत.
06/8
वर्षाच्या सुरुवातीला पवई येथील एका उजाड गोदामात बिबट्याचे शावक आढळून आले होते. सुरुवातीला असं वाटलं की त्याला आईनं सोडून दिले आहे. तथापि, परिसरातील कॅमेरे तपासल्यावर उघडकीस आलं की आईनं त्या मुलाला सुरक्षित ठेवण्यासाठी तिथं सोडलं होते. तिची आई शिकारीसाठी बाहेर गेली असताना दिवसभर तिथेच बसून होते आणि त्याची देखभाल करण्यासाठी परत आली. फुटेजमध्ये असं दिसून आलं आहे की, त्याची आई नियमितपणे त्या पिल्लाला भेट देत होती.
07/8
दरम्यान, आरे परिसरात रविवारी प्रथम युनिट ३ मध्ये लहानग्यावर हल्ला केल्यानंतर दोनच दिवसात युनिट ३१ मधील एका घरामध्ये बिबट्या शिरला होता. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागानं योग्य दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. सोमवारी रात्री युनिट ३१ मधील घरात बिबट्या भक्ष्याच्या शोधात चक्क घरात घुसला. यापूर्वी एक महिला देखील बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झाली होती. महिन्याभरात दोन जणांवर हल्ला झाल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.
08/8
हल्ल्यांशिवाय बिबट्याचा आसपासच्या मानवी वस्तीत वावर असल्याचं अनेकदा निदर्शनास आलं आहे. आरे परिसरात अनधिकृत बांधकामं वाढल्यानं जंगल नष्ट झाले आहेत. त्यामुळे जंगली प्राणी मानव वस्तीत शिरत आहेत. या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी करत आहेत.
पुढील बातमी
इतर बातम्या