विरारच्या मांडवीमधील शेतात आढळला बिबट्याचा संशयास्पद मृतदेह

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

विरारच्या मांडवी भामटपाडा वन परिक्षेत्राच्या हद्दीत असलेल्या शेतामध्ये एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे. सकाळी दहा वाजेच्या सुमारास ५ ते ६ वर्षांचा सात फूट लांब बिबट्याचा संशयास्पद मृतदेह आढळून आला.

मृत्यूचं कारण अस्पष्ट

याबाबत मांडवी वन विभागानं ठाण्याच्या रेस्क्यू टिमला याबाबत माहिती दिली. मांडवी वन विभागानं दिलेल्या माहितीनुसार सकाळच्या सुमारास ठाण्याची वन विभागाची रेक्स्यू टीम त्या बिबट्याला पकडण्यासाठी आली होती. परंतु, त्यावेळी रेक्स्यू टीमला तो बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.

वन विभागानं या बिबट्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राष्ट्रीय गांधी उद्यानात पाठवला. मात्र, बिबट्याचा मृत्यू कसा झाला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. त्यामुळे शवविच्छेदन अहवालानंतर त्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल.

पुढील बातमी
इतर बातम्या