आम्हाला मायदेशी परतू द्या ! कतारमध्ये अडकल्या बहिणींची आर्त विनवणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक
जगभरात सध्या कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनची स्थिती आहे. बहुतांश देशांनी खबरदारी म्हणून विमानसेवा बंदठेवल्यामुळे अनेक नागरिक परदेशात अडकले आहेत. परदेशात अडकलेल्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे. सर्व काही ठप्प झाल्यामुळे हाताचे काम गेले, जवळील पैसे संपलेले आहे. व्हिजा संपत असल्यामुळे परदेशातील सुरक्षा यंञणेकडून दबाव वाढत आहे. हालाकीच्या दिवसात कोणतिही मदत मिळत नसल्यामुळे कतार मध्ये अडकलेल्या दोन बहिणी भारतातील लाँकडाऊन लवकर उठण्याची वाट पाहत आहेत.

कतारमध्ये राहणारी लीला फड ही प्रसिद्ध महिला बाॅडिबिल्डर असुन, ती कतार मधील दोहा नज्मा या  ठिकाणी एका जिममध्ये  फिटनेस ट्रेनर म्हनून काम करते. मुळची नाशिकची असलेली लिला फड ही मुंबईत स्थायीक झाली होती. मात्र  त्यानंतर ती कतार येथील दोहा नज्म या  ठिकाणी जीम ट्रेनर म्हणुन रुजु झाली होती. अशातच लिलाला भेटण्यासाठी तीची बहिण  सुमन फड-भट  ही आॅक्टोबर 2019 मध्ये तीन महिन्याच्या  व्हिजावर तिला भेटण्यासाठी गेली होती. मात्र  जानेवारी मध्ये  व्हिजा संपल्या नंतर तीने आणखी तीन महिने वाढवुन घेतला होता. मात्र फेब्रुवारीनंतर संपूर्ण जग कोरोनाच्या संसर्गाखाली येऊ लागले. जगातील अनेक देशांत कोरोनाने धुमाकुळ घालण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक देशांनी लाॅकडाऊन घोषीत केला. त्यातच सुमनने भारतात परतण्यासाठी तिकीट बुक केले. मात्र देशांत देखील 23 मार्च पासुन लाॅकडाऊन घोषीत केल्यामुळे आंतरराष्ट्रीय विमान प्रवास तसेच ये णाऱ्या  विमानाला बंदी घातली.

त्यामुळे ती कतारमध्ये  अडकुन पडली आहे. एकीकडे लाॅकडाऊनमुळे जीम बंद झाल्याने, या  दोघींची देखील या  ठिकणी फरफट सुरु झाली आहे. तर मुंबईत राहणारे या दोघींचे कुटुंब देखील चिंतेत आहे. कतारमध्ये  लिलाने अनेकविध मार्गाने भारतीय वकिलातीशी संपर्क साधण्या चा प्रयत्न केला. मात्र लाॅकडाऊनमुळे या  दोघींचा संपर्क होऊ शकला नसल्याचे लिलाने सांगितले. तसेच त्यांच्याकडे शिल्लक असलेले अन्नधान्य तसेच इतर जिवनावश्यक वस्तू संपत आल्याने, त्याना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे लिलाने सांगितले. अशातच लाॅकडाउन वाढण्याची चिन्हे दिसत असल्याने, या दोघीही घाबरुन गेल्या  आहेत. एकीकडे कतारमध्ये  सुरु असलेली फरफट आणि दुसरीकडे कुटुंबियांची काळजी यामुळे दोघीही कासावीस होऊन, एकमेकींना धिर देत आहेत. तर त्यांचे कुटुंबिय चिंतेत आहे.

करातमध्ये 12 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आले आहे. तेव्हापाहून तेथे लीलाच्या कमाईचे साधन पूर्णपणे बंद झाले आहे. केरळमधील काही स्वयंसेवी मार्फत त्यांना जीवनावश्यक वस्तूंची दोन किट मिळाले आहेत. पण ते किती दिवस पूरतील, हे सांगता येत नाही, अशी खंत लीलाने व्यक्त केली.
पुढील बातमी
इतर बातम्या