Corona virus: मोठी बातमी, महाराष्ट्राच्या सीमा बंद!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

Corona virus:  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला. राज्यातील परिस्थिती लॉक डाऊनमध्ये गेली असून, परदेशी नागरिकांसाठी महाराष्ट्राच्या सीमा मध्यरात्रीपासून बंद केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परदेशात पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय नागरिकामुळे महाराष्ट्रात करोनाला प्रवेश मिळाला. त्यानंतर गेल्या दहा ते पंधरा दिवसात महाराष्ट्रातील स्थिती चिंताजनक बनत गेली.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.  खालापूर, कळंबोली, कामशेत या टोलनाक्यांवर पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून पोलीस लोकांची ओळखपत्रं तपासत आहेत.

अखेरीस रविवारी महाराष्ट्र लॉक डाऊनमध्ये गेला. गेल्या पंधरा दिवसात परदेशातून आलेल्या अनेकांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यांच्या संपर्कात आल्यानं अनेकांना त्याची लागण झाली आणि रविवारी महाराष्ट्रातील करोनाबाधितांचा आकडा 85 वर गेला. परदेशातून येणार्‍या नागरिकांमुळे कोरोना पसरत असल्याचे राज्य सरकारने केंद्र सरकारला सांगितले होते. त्यामुळे परदेशातून येणारी विमान बंद करावीत अशी मागणी राज्याकडून केंद्राकडं करण्यात आली. अखेरीस आज मध्यरात्रीपासून परदेशातून एकही विमान महाराष्ट्रात येणार नाही. पुर्णपणे हवाई वाहतूक बंद राहणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केलेल्या निवेदनात ही माहिती दिली.

दोन दिवसांपासून प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत आहे. ही संख्या थांबवायची असल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन करून सुद्धा, सोमवारी नागरिक खासगी गाड्यातून बाहेर पजत सरकारी नियम पायदळी तुडवताना निदर्शनास आले. अखेर पोलिस महासंचालकांनी सर्व आयुक्तांना त्यांच्या सीमा बंद करण्याचे अनऔपचारिक आदेश दिले. त्यानुसार मुंबई बाहेर अनावश्यक बाहेर पडलेल्यांची गाडी अडवून पोलिस त्यांना माघारी पाटवत होते. केवळ मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरच नव्हे तर राज्यातील संपूर्ण नागरी भागात १४४ कलम नाईलाजास्तव लावण्यात आले आहे. त्यामुळे मध्यरात्रीपासून परदेशातून देशात कोणीही येणार नाही. खासगी बस, एसटी, लोकल पूर्णपणे बंद राहणार आहेत. परदेशातून येणार्‍यांनी एकटे राहावे, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या