उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ASSOCHAMच्या परिषदेत ही माहिती दिली.
या उपक्रमाअंतर्गत कापूस उत्पादनापासून त्यावर प्रक्रिया, वस्त्रोद्योगातील निर्मिती आणि अखेर निर्यात अशी संपूर्ण साखळी महाराष्ट्रातच उभारण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
सध्या शेतकरी मोठ्या प्रमाणात कच्चा कापूस विकतात. मात्र, कापसावर प्रक्रिया करून त्यापासून धागा, कापड आणि तयार वस्तू महाराष्ट्रातच तयार केल्या गेल्या, तर त्यातून कापसाची किंमत देखील वाढले. यामुळे शेतकरी, उद्योजक आणि वस्त्रोद्योगातील कामगारांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे.
महाराष्ट्र हे देशातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांपैकी एक आहे. त्यामुळे कापूस उत्पादनापासून थेट परदेशातील ग्राहकांपर्यंत पोहोचणारी संपूर्ण व्यवस्था उभारून महाराष्ट्राला मोठं Textile Export Hub बनवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
यासाठी वस्त्रोद्योग आणि निर्यात क्षेत्रातील पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि जागतिक बाजारपेठेतील स्पर्धात्मकता वाढवण्यावरही भर दिला जाणार आहे.
थोडक्यात, शेतातून कापूस बाहेर विकण्याऐवजी त्याच कापसापासून महाराष्ट्रातच उत्पादन आणि त्यानंतर थेट परदेशात निर्यात हा सरकारचा ‘Farm to Foreign’चा प्लॅन आहे.
हेही वाचा