इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात घट केली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.

काँग्रेसचे प्रेदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. १४ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलनं करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय. 

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसं जनजागरण अभियानाची घोषणा केलीय. जन जागरण अभियान म्हणून देश वाचवण्याचं आवाहन आहे. महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे. आपणही या, आमच्या जन जागरण अभियानाशी जोडले जा आणि देश वाचवा, असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इंधनाचे दर स्थिर आहेत. IOCL नं बुधवारी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत १०४.०१ रुपये आणि डिझेलची किंमत ८६.७१ रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे १०९.९६ आणि ९४.१३ रुपये प्रतिलीटर इतका आहे.


हेही वाचा

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या उलाढालींचे मास्टर माइंड- नवाब मलिक

'कर्तव्य पार पाडताना राजकारण करु नये, राजकारण येऊ देणार नाही' – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पुढील बातमी
इतर बातम्या