धार्मिक स्थळांसाठी 'अशी' आहे गाईडलाइन!

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचं नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलं आहे. मात्र धार्मिक स्थळांमध्ये प्रवेश करताना नियम, शिस्तीचं काटेकोर पालन सगळ्यांना करावंच लागेल. मुख्य म्हणजे प्रत्यक्ष प्रार्थनागृहांतील गर्दी टाळण्याचं आणि स्वतःबरोबर इतरांचं रक्षण करण्याचं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यानुसार राज्य सरकारकडून याबाबतची गाईडलाइन जारी करण्यात आली आहे.

कोरोना संदर्भातील नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याची जबाबदारी धार्मिक स्थळांचं व्यवस्थापन सांभाळणाऱ्या समितीवर असणार आहे. या गाईडलाइननुसार...

  • कंटेन्मेंट झोनमधील धार्मिक स्थळे बंदच राहतील, केवळ कंटेन्मेंट झोनबाहेरील धार्मिक स्थळेच उघडण्यास परवानगी असेल
  • ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि १० वर्षांखालील लहान मुलांना प्रार्थनास्थळांमध्ये देण्याचं टाळावं
  • दोन व्यक्तींमध्ये किमान ६ फुटांचे अंतर राखणं बंधनकारक  
  • मूर्ती, पुतळे वा पवित्र धर्मग्रंथाला स्पर्श करण्याचं टाळावं
  • प्रसादाचं वाटप तसंच पवित्र जलाचे शिंपण टाळावं
  • अन्नदानाच्या ठिकाणी सुरक्षित वावराची काळजी घ्यावी
  • धार्मिक स्थळ परिसरात कोविड विषयी जनजागृती करणारे माहिती फलक असावेत मार्गदर्शक सूचनांची माहिती देणारी एखादी ऑडिओ कॅसेटही लावण्यात यावी
  • प्रार्थनास्थळांमध्ये असलेली मोकळी जागा, व्हेंटिलेशनची उपलब्धता या सर्व गोष्टींचा अभ्यास करून किती गर्दी प्रार्थनास्थळांमध्ये असायला हवी याचं नियोजन व्हावं
  • मास्क, सॅनिटायझेशन, सुरक्षित वावराची काळजी घ्यावी
  • प्रार्थनास्थळांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाने हात आणि पाय स्वच्छ धुणं आवश्यक, तशी व्यवस्था असावी
  • प्रार्थनास्थळांत शिरण्याआधी चप्पल, बूट आपापल्या गाडीमध्येच काढून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसा पर्याय नसल्यास प्रत्येकाने स्वत:सोबत कुटुंबीयांच्या चपला, बूट वेगळ्या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करावी.
  • धार्मिक स्थळाच्या बाहेर पार्किंगमध्ये गर्दी होणार नाही, परिसरातील इतर दुकाने, कॅफेटेरियामध्ये देखील सुरक्षित वावर राखला जाईल याची काळजी घ्यावी
पुढील बातमी
इतर बातम्या