29 सप्टेंबर 2025 पासून राज्याच्या बहुतेक भागात हवामान स्थिर राहील. तथापि, 2 ते 7 ऑक्टोबर 2025 दरम्यान विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदर्भात वादळ येण्याची शक्यता सर्वाधिक आहे.
7 ऑक्टोबर 2025 पासून राज्यात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. 8 ऑक्टोबर 2025च्या सुमारास मान्सून राज्यातून माघार घेईल. त्यानंतर, पुढील काही दिवसांत मान्सून संपूर्ण राज्यातून निघून जाईल अशी अपेक्षा आहे.
संपूर्ण राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. मुंबईसह राज्यातील इतर भागात पावसाचा जोर होता. पण येत्या काही दिवसात मुंबईसह राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. त्यामुळे यापुढे फारसा पाऊस पडणार नाही. अधूनमधून हलक्या सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मुंबईत काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने गेल्या आठवड्यात दमदार हजेरी लावली. राज्यातही सर्वदूर पाऊस सक्रिय झाला होता. त्यानंतर सोमवारपासून पावसाने पुन्हा विश्रांती घेतली आहे.
कमी दाब प्रणाली गुजरातकडे सरकल्यामुळे आजपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर ओसरणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले. त्यामुळे यापुढे पावसाचा जोर नसेल.
पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या तापमानाचा पारा 30 ते 32 अंश सेल्सिअस पर्यंत आहे. यात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे.
हेही वाचा