भारत सरकारच्या जलसंपदा मंत्रालयाच्या नदी विकास (National water mission) आणि गंगा पुनरुज्जीवन विभागाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय जल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्राला प्रथम क्रमांक (First rank) मिळाला आहे.
जलसंधारण आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राला (maharashtra) हा सन्मान (award) देण्यात आला आहे.
महाराष्ट्राबरोबरच नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेने "सर्वोत्तम नागरी स्थानिक संस्था" श्रेणीत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
तसेच नाशिक येथील कानिफनाथ जल/पाणी वापर सहकारी संस्थेने "सर्वोत्तम जल/पाणी वापर संस्था" श्रेणीत दुसरे स्थान पटकावले आहे.
जलशक्ती मंत्रालयाचे सचिव व्ही.एल. कांता राव यांनी राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना पत्र लिहून या कामगिरीची माहिती दिली आहे.
हा पुरस्कार सोहळा 18 नोव्हेंबर 2025 रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवन येथे होणार आहे आणि राज्याला ट्रॉफी, प्रशस्तिपत्र आणि रोख रकमेने सन्मानित केले जाईल.
जलसंधारण, जल व्यवस्थापन आणि नदी पुनरुज्जीवन क्षेत्रातील राज्याच्या प्रयत्नांना राष्ट्रीय मान्यता मिळाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जलसंपदा (तापी विदर्भ आणि कोकण खोरे विकास महामंडळ) मंत्री गिरीश महाजन आणि जलसंपदा (गोदावरी आणि मराठवाडा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच जलसंपदा विभागाचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा