सन 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रातून (maharashtra) ब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात झाली आहे.
गेल्या पाच वर्षांत या क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली असून, 2020-21 मधील 3 हजार 684 कोटी रुपयांच्या तुलनेत निर्यात जवळपास दुप्पट झाली आहे.
निर्यातीचे परिमाणही वाढून वार्षिक 2.27 लाख मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. विशेषतः कोळंबी आणि गोठवलेल्या मासळीचा निर्यातीत मोठा वाटा आहे.
अमेरिका आणि चीनसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये कोकणातील कोळंबीला (shrimp) मोठी मागणी आहे. तिची गुणवत्ता आणि चव यामुळे परदेशी ग्राहकांमध्ये ती विशेष लोकप्रिय ठरत आहे.
मत्स्य विकास मंत्री नितेश राणे (nitesh rane) यांनी मत्स्यव्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि निर्यातक्षमतेत वाढ करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. त्यांच्या पुढाकारामुळे कोकणातील मच्छीमारांना थेट जागतिक बाजारपेठांशी जोडण्यास मदत झाली आहे.
भारताच्या एकूण मत्स्य निर्यातीत अमेरिका ही सर्वात मोठी बाजारपेठ ठरली आहे. 2024-25 मध्ये 22 हजार 723 कोटी रुपयांची निर्यात झाली आहे.
तसेच त्यानंतर चीन (10 हजार 668 कोटी), युरोपियन युनियन, दक्षिण-पूर्व आशिया आणि जपान या देशांमध्येही भारतीय मासळीला (fish) मोठी मागणी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार आणि वाढत्या उत्पादन खर्चासारख्या आव्हानांवर मात करत महाराष्ट्राने (maharashtra) गुजरात आणि आंध्र प्रदेशासारख्या राज्यांच्या बरोबरीने आपले स्थान टिकवून ठेवले आहे.
हेही वाचा