पश्चिम रेल्वेनं (western railway) बोरिवली ते विरार (virar) मार्गाचा विस्तार (expand) करण्याचं काम सुरू केलं आहे.
या कामातील पहिला टप्पा कांदिवली ते बोरिवलीदरम्यान (borivali) पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेतलं होतं. त्यासाठी महिनाभर ब्लॉक लागू केला होता.
ते काम पूर्ण झालं असून, आता पश्चिम रेल्वेनं या कामातील दुसरा टप्पा सुरू केला आहे. पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर मोठे बदल करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेच्या या प्रकल्पाचं उद्द्येश्य लांब पल्ल्याच्या गाड्यांना उपनगरीय लोकल गाड्यांपासून वेगळे करणं आहे.
यामुळे उपनगरीय लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिका तयार केली जाणार आहे. यामुळे मुंबईकरांचा रेल्वे प्रवास सुलभ होणार आहे.
या 26 किलोमीटरच्या पट्ट्यात दहिसर, भाईंदर, नायगाव आणि विरार यांसारख्या अनेक स्थानकांचं स्थलांतर करण्यात येणार आहे.
धीम्या मार्गांचे फलाट नवीन मार्गांना सामावून घेण्यासाठी बदलले जातील. प्रकल्पाचा अंदाजित खर्च 2184 कोटी रुपये असून तो 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे.
बोरीवली ते विरारपर्यंतच्या संपूर्ण पट्ट्यात विद्यमान मुख्य मार्गांच्या पश्चिम बाजूला दोन नवीन मार्गिका बांधल्या जातील.
या बांधकामामध्ये तीन मोठे पूल, 16 लहान पूल, एक भुयारी मार्ग आणि दोन महत्त्वाचे पूल बांधले जाणार आहेत.
विशेषतः वसई खाडीवरील पूल क्रमांक73 आणि 74 यांचा ही विकास केला जाणार आहे. पूल क्रमांक 73 च्या पायाभरणीचं काम सुरू झाले आहे आणि भाईंदरजवळील (bhayandar) एक जुना ऐतिहासिक पूल पाडला जात आहे.
भायंदर आणि वसई स्थानकांवर मोठ्या प्रमाणावर पुनर्रचना केली जाणार आहे. यामध्ये नवीन प्लॅटफॉर्म बांधणे आणि सध्याच्या प्लॅटफॉर्मचा पुनर्वापर करणे यांचा समावेश आहे.
दहिसर, मीरा रोड, नायगाव आणि नालासोपारा यांसारख्या इतर स्थानकांवरही सुधारणा केल्या जातील आणि नवीन प्लॅटफॉर्म बांधले जातील.
दहिसरचे फलाट उत्तरेकडे, भाईंदरचे पश्चिमेकडे आणि विरारचे थोडे दक्षिणेकडे सरकवले जातील.
हेही वाचा