गोवंडीत गोदामाला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम & मंगल हनवते
  • सिविक

कमला मिल आगीपासून सुरू झालेलं मुंबईतील आगीच सत्रं काही थांबताना दिसत नाही. रोज आगीच्या घटना घडत असून सोमवारी दुपारी गोवंडीतील एका गोदामाला आग लागली. ही आग भीषण असून आग लागल्याचं कारण अद्याप समजलेलं नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे ८ फायर इंजिन आणि ६ जेटी घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

गोवंडीतील गोवंडी स्टेशन परिसरातील रोडवली आयेशा हाॅल शेजारील महाराष्ट्र कम्पाऊंडमधील गोदामाला दुपारी १ वाजून ३२ मिनिटांला आग लागली. काही क्षणातच आगीची तीव्रता वाढली असून अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू केले आहेत. या आगीत कुणी अडकलं आहे का याची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही.

पुढील बातमी
इतर बातम्या