मुंबईत (mumbai) मलेरियाच्या रुग्णांत मोठी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या मध्यावरच मुंबईत 6,000 हून अधिक मलेरियाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. हा आकडा गेल्या वर्षाच्या तुलनेत 21टक्क्याने जास्त आहे.
मान्सून लवकर सुरू झाल्याने आणि आता पावसाचे प्रमाण वाढल्याने रोगराई वाढल्याचे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने म्हटले आहे. मात्र, कमजोर तपासणी व देखरेख व्यवस्थाही मलेरियाच्या वाढीला कारणीभूत ठरत आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
या त्रुटींचा उलगडा अलीकडील वैद्यकीय अधिकारी प्रशिक्षण कार्यक्रमा दरम्यान झाला. यावेळी अधिकाऱ्यांनी उघड केले की, पालिकेला सातत्याने वार्षिक रक्त तपासणी दराच्या (ABER) राष्ट्रीय निकषांमध्ये अपयश पत्करावे लागले आहे.
ABER म्हणजे वार्षिक रक्त तपासणी दर, जो तपासलेल्या ब्लड स्लाइड्सच्या संख्येला शहराच्या लोकसंख्येने भाग देऊन आणि 100 ने गुणून मोजला जातो.
जास्त ABER म्हणजे सक्रिय मलेरिया (malaria) तपासणी, तर कमी ABER म्हणजे तपासणी आणि देखरेख अपुरी आहे, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
राष्ट्रीय मार्गदर्शक सूचनांनुसार ABER किमान 12% असणे आवश्यक आहे. मात्र, मुंबईत ABER वारंवार या पातळीखालीच राहिला आहे. याचे एक कारण म्हणजे, पालिकेचे ब्लड सलाईड तपासणी (gold-standard) ऐवजी Rapid Diagnostic Kits (RDKs) वर अधिक अवलंबून राहणे.
2015 ते 2024 या कालावधीतील आकडेवारीनुसार, मुंबईत ABER बहुतेक वेळा 12% पेक्षा कमी राहिला आहे.
भारत सरकारने 2030 पर्यंत मलेरिया निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवले आहे. या उद्दिष्टासाठी WHO ची सलग तीन वर्षांची प्रमाणपत्रे आवश्यक आहेत. यासाठी, मुंबईत 2027 पर्यंत मलेरियाचा समूळ नष्ट होणे आवश्यक आहे.
हेही वाचा