ठाण्यातील मॉल ग्राहकांसाठी खुले

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

ठाणे शहरातील  मॉल्स आजपासून (बुधवार) खुले झाले आहेत. महानगरपालिकेने ठाणे शहरातील मॉल्स खुले करण्याची परवानगी दिली आहे.  यामुळे कोरम मॉल, व्हिवियाना मॉल, सिटी मॉल उघडले जाणार आहेत. 

राज्य सरकारने १ ऑगस्टपूर्वीच ठाण्यातील मॉल्स, मार्केट व कॉम्प्लेक्स उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र, ठाणे शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. त्यामुळे ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर बिपिन शर्मा यांनी मॉल्स, मार्केट आणि कॉम्प्लेस उघडण्यास नकार दिला होता. आता एका महिन्यानंतर पालिकेने मॉल्स उघडण्यास परवानगी दिली आहे.

याआधी १५ ऑगस्टपासून महापालिकेने दुकाने उघडण्यास परवानगी दिली होती. एक दिवस आलटून-पालटून एकेका रस्त्यावरील समोरासमोरील दुकाने उघडण्याची परवानगी  होती. मात्र मॉल्स, मार्केट, कॉम्प्लेक्स, जिम, स्विमिंग पूल यांना बंदी घातली होती. आता ही बंदी उठवल्याने ठाण्यातील कोरम मॉल, व्हिवियाना मॉल, सिटी मॉल, हाय स्ट्रीट मॉल, अनंत मॉल, वंडर मॉल असे सर्वच मॉल्स खुले होणार आहेत.


हेही वाचा -

सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश

खासगी रुग्णालयात राखीव खाटा ठेवण्यास ३ महिन्यांची मुदतवाढ


पुढील बातमी
इतर बातम्या