मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आता या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून अनेक ठिकाणी बसेसवर दगडफेक, नेत्यांची घरे जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. आजही मराठा बांधवांनी आक्रमक पवित्रा घेत मुंबई-बेंगलोर महामार्ग रोखून धरला.

याबाबत अधिक माहिती अशी की, आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातील मराठा बांधव चांगलेच आक्रमक झाले आहेत. पुण्यातील नवले पुलाजवळ मराठा आंदोलकांनी टायर जाळून मुंबई-बेंगळुरू महामार्गावर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी संपूर्ण महामार्ग रोखून धरला.

मराठा बांधवांच्या आक्रमक पवित्र्यामुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक ठप्प झाली असून वाहनांच्या 8 ते 9 किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई-बेंगळुरू महामार्गावरून सातारा, सांगली कोल्हापूर आणि अनेक जण मुंबईकडे जात आहेत, मात्र गेल्या दोन तासांपासून आंदोलकांनी महामार्ग रोखून धरल्याने प्रवाशांचे व वाहनचालकांचे हाल होत आहेत.

मनोज जरंगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी निदर्शने, जाळपोळ सुरू असून बुलढाण्यात आज नागपूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देऊळगाव मही येथे मराठा समाज आक्रमक झाला. अर्धा तास रास्ता रोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आरक्षणाची मागणी केली.


हेही वाचा

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना फटकारले

पुन्हा पंतप्रधानांचा अपमान केल्यास तुम्हीही अपमानासाठी तयार राहा : आशिष शेलार

पुढील बातमी
इतर बातम्या