आर. के. स्टुडिओला भीषण आग, २ स्टुडिओ जळून खाक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कपूर कुटुंबीयांच्या मालकीच्या चेंबूरमधील प्रसिद्ध आर. के. स्टुडियोला शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भीषण आग लागली. तब्बल ११ फायर इंजिनच्या मदतीने मुंबई अग्निशमन दलाने ही आग विझवली.

काय म्हणाले ऋषी कपूर वाचा -

पण तोपर्यंत या आगीत स्टुडिओ क्रमांक १ आणि २ असे दोन स्टुडिओ जळून खाक झाले. आगीत स्टुडिओतील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुठल्याही जीवितहानीची नोंद अद्याप झालेली नाही.  

आर. के. स्टुडिओत 'डान्स इंडिया डान्स' या 'रिअॅलिटी शो'चे शूटिंग सुरू होते. त्याचवेळेस शाॅटसर्किटने ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या प्रचंड धुराचे लोट जवळच असलेल्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेपर्यंत जाऊन पोहोचल्याने या मार्गावरून वाहन चालवणे चालकांना कठिण झाले. त्यामुळे चेंबूरकडून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पोलिसांनी थांबवली होती. परिणामी चेंबूर नाका येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.

अद्याप या आगीत किती नुकसान झाले हे सांगणे कठीण असले, तरी स्टुडियोतील लाकडी सामानाचे बरेच नुकसान झाले आहे. या आगीत इमारतीचा काही भाग कोसळल्याचीही माहिती मिळत आहे.

 


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या